धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता कोविड रुग्णांच्या सेवेसाठी येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृति संस्थेतर्फे “हिरा इंटरनॅशनल स्कूल” एरंडोल रोड येथे कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात येत आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता धरणगाव परिसरातील सौम्य लक्षणे असलेल्या कोविड पॉसिटीव्ह रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक उपचार करण्यासाठी क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेला कोविड केअर सेंटर तथा विलगीकरण केंद्र चालवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने हिरा इंटरनॅशनल स्कूल, एरंडोल रोड, धरणगाव येथे दि. १८ एप्रिल २०२१ रविवारी, सकाळी १०:०० वा. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी जिल्हा संघचालक डाॅ. निलेश पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे. सोबत हिरा इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष दिपकशेठ नगरीया,खाज्या नाईक संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे उपस्थित राहणार आहेत. तरी सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क नं. मनोज पाटील 7887893493, विलास महाजन 8830123882.