पातोंडा (प्रतिनिधी) प्रदिप पवार पातोंडा बसस्टॉपपासून ते नांद्री पुलांपर्यंत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अमळनेर (जळगाव विभाग) व एम. एस. सी. बी. इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले.
जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांच्या इच्छेनुसार रस्ता पोल शिफ्टिंग आणि दोन्ही बाजूस गटारी सह डीवायडर मागणी केली होती आणि त्याची वाढत्या अपघात प्रमाण, अस्वच्छता, बंद पडलेल्या गटारी आणि काळाची आवश्यकता लक्षात घेता त्याबाबतीत लवकरच कामं सुरू होईल. गावाच्या एन्ट्री बाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा त्यासंदर्भात हे काम आवश्यक होतं, आणि त्याबरोबरचं सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील, राकेश पाटील सह अधिकारी वर्ग आणि इंजिनियर टीम महाराष्ट्र इलेक्ट्रसिटी बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पाहणी केली.