भुसावळ (प्रतिनिधी) जामनेर रोडवरील दिनदयाल नगरातील गिरीश किरण दुकानाजवळ सीट कव्हरचे पैसे देणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटले गेले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे बंधू अनिल ठाकूर हे सीट कव्हरचे पैसे देण्यासाठी गेले असता अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी (रा. दिनदयाल नगर भुसावळ) आणि जावेद उर्फ पोटली नवाब बागवान (रा. पंचशील नगर) या दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर, रविंद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव ,प्रशांत परदेशी, रवींद्र तायडे, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे यांनी कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, रविंद्र तायडे करत आहे.