जळगाव प्रतिनिधी: सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी लंडनमधील सॅवॉय येथे होणाऱ्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन (LGEC) मध्ये जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र रोहित दिलीप निकम यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित ज्युरी समितीने त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी आणि समाजाप्रती योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णतः स्वतंत्र, पारदर्शक आणि गुणवत्ताधारित असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
हा पुरस्कार सोहळा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांसह इतर मान्यवरांच्या
प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार असून, जागतिक स्तरावरील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. विविध क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात रोहित निकम यांचा देखील सन्मानित करण्यात येणार आहे .
निकम यांनी या गौरवाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक प्रयत्नांचा नव्हे तर आपणा सर्वांच्या सहकार्य, प्रेम आणि आशीर्वादाचा परिणाम आहे. महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
सध्या रोहित दिलीप निकम हे .. अध्यक्ष – जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्था, उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, संचालक – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि उपाध्यक्ष – भाजप जळगाव पश्चिम या पदांवर कार्यरत असून, ते शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी सातत्याने काम करत आहेत.