जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच जे थीम महाविद्यालयात रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ करीम सालार होते.
कार्यक्रमात एम जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स ना भाऱंबे , क ब चौधरी उ म विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ सचिन नांद्रे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इकबाल शाह, सचिव एजाज मलिक, ज़फर शेख तसेच मुस्लिम धर्माचे प्रतिनिधि सोहेल आमिर, सिख धर्माचे प्रतिनिधि हरजिंदरसिंग छाबड़ा, बौद्ध धर्माचे धर्म गुरु भदन्त सुंगन्तवंस संघ नायक महाथेरो, ख्रिचन धर्माचे धर्मगुरु फादर वळवी रेव यांची उपस्थिति उल्लेखनीय होती. कार्यक्रमाचा प्रारंभ तिलावते कुराण ए पाकने डॉ अख्तर शाह यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा मुजम्मिल काजी यानी तंर आभार प्रदर्शन डॉ वकार शेख व्यक्त केले.
कार्यक्रमात सोहेल शेख, हरजिंदरसिंग छाबड़ा, भदन्त सुंगन्तवंस संघ नायक महाथेरो, ख्रिचन धर्माचे धर्मगुरु फादर वळवी रेव यांनी आप आपल्या धर्मातील उपवासाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. सोहेल आमिर यांनी मार्गदर्शनात म्हटले कि, आध्यात्मिक उन्नती करीता रोजा हे साधन आहे . उपवासाने चारित्र्य निर्माण होते. कार्यक्रमात डॉ एस डी अकोले, डॉ अनिल पाटील, डॉ के जी कोल्हे, डॉ व्ही जे पाटील तसेच बहुसंख्येने रोजेदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.