अमळनेर (प्रतिनिधी) आज जि.प. शाळा जळकेतांडा येथील सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
यात नमकीन चिवडा पाॕकिट,बुंदी पाॕकीट,टोपी,चेंडू असे साहीत्य मा.डाॕ.अपर्णा भटकासार प्रेसिडेंन्ट रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रल, मा.राजूदादा दोषी रोटेरियन,मा.रविंद्रदादा वाणी रोटेरियन,मा.डाॕ.विद्या चौधरी रोटेरियन,शाळेतील शिक्षक सोमनाथ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने सोमनाथ पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या शाळेत दिवाळीत फराळ वाटपाचा कार्यक्रम मागील सहा वर्षे पासून अखंड सुरू असल्याचे शाळेतील शिक्षक सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी सांगितले. तसेच वंचितां सोबत दिवाळी साजरी करण्याचे समाधान तथा आनंदा वेगळाच मिळतो. यावर्षी रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलने केलेल्या अनमोल सहकार्या बद्दल अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी तथा सदस्य यांचे आभार न मानता सदैव ऋणात राहू असे समारोपात सोमनाथ पाटील यांनी सांगितले .