आग्रा (वृत्तसंस्था) जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या फिरोजाबाद येथील एका व्यक्तीने फोन करुन ही खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. यानंतर सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान ही अफवा असल्याचं समोर आलंय.
देशाची शान असलेल्या ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र ही अफवा असल्याचं आग्र्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केलं. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर ताजमहाल परिसरात जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचं समोर आलं. तरुणाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.