नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नुकताच उत्तराखंडमधील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. एका वृद्ध दाम्पत्याने नातवंड हवी परंतु मुलाने याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या वृद्ध दाम्पत्याने आपल्याच मुलगा आणि सुनेच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे आणि ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
उत्तराखंडात हरिद्वार इथं राहणाऱ्या एस. आर प्रसाद आणि त्यांच्या पत्नीने आपल्याच मुलाविरुद्ध कोर्टाची पायरी चढली आहे. 2016 साली त्यांच्या मुलाचे लग्न झाले. मात्र अजूनही नातवंडाचे तोंड पाहायला न मिळाल्याने हे दोघे संतप्त झाले आणि त्यांनी तक्रार केली. आम्हाला नातू होवो किंवा नात आम्हाला फक्त नातवंड पाहिजे. मुलगा-मुलगी असा भेद नाही, असं हे एस. आर. प्रसाद म्हणत आहेत.
एस. आर प्रसाद सांगतात, मी माझे सगळे पैसे माझ्या मुलाला दिले. त्याला अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पैसे दिले. घर बांधण्यासाठी आम्ही कर्ज काढलंय. आम्ही व्यक्तिगत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणित आहोत. म्हणून आम्ही मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मागितले आहेत.
याबद्दल बोलताना वकील ए. के श्रीवास्तव म्हणाले, हा खटला आपल्या समाजाचं वास्तव दाखवतो. आपण मुलांमध्ये सर्व गुंतवणूक करतो. त्यांना चांगल्या जागी नोकरी करता यावी यासाठी सक्षम बनवतो. पालकांची आर्थिक बाबतीतील काळजी घेण्याची जबाबदारी मुलांची असते.. या दोघांनी एका वर्षात नातवंड मिळावे अशी अपेक्षा केली आहे तसे न झाल्यास त्यांनी 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.