धरणगाव (प्रतिनिधी) आपण आजवरच्या वाटचालीत ग्रामीण भागाच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून आगामी काळातही अविरतपणे ही कामे सुरूच राहतील. गावातील विविध कामांपासून ते शेतरस्त्यांपर्यंतच्या कामांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लागत असून जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मूलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास येत आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली असून सतखेडा ते झुरखेडा 90 लाख रस्त्याचे डांबरीकरण टेंडर प्रक्रियेत आहे, पिंपळेसिम येथे आपल्या परिसरातील सर्वाधिक किंमतीचा सुमारे साडेचार कोटीच्या पुलाचे काम सुरू आहे. असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील सतखेडा येथिल विकासकामांच्या लोकार्पण व उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. सतखेडाच्या विकासासाठी या पुढे देखील सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील ना.गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी गावात भव्य मिरवणूक काढून ना. गुलाबराव पाटील यांचा परिसरातील लोकप्रतिनिधींनी हृद्द सत्कार केला.
70लाखांच्या कामांचे झाले भूमिपूजन
सतखेडा येथे पाणीपुरवठा योजना 43 लक्ष, सतखेडा ते हनुमंतखेडा रस्त्याचे डांबरीकरण 15 लक्ष, सतखेडा येथे मागासवर्गीय वस्तीत प्रवेशद्वार व चौकसुशोभीकरण रक्कम 8 लक्ष, गावंतर्गत काँक्रेटिकरण 3 लक्ष अश्या एकूण 70 लाखाच्या कामांचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथाजिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, प्रेमराज पाटील, मुकूंदराव नन्नवरे, सचिन पवार, मोतीआप्पा पाटील, प्रमोद बापू पाटील, मंगलआण्णा पाटील, भैय्या माळी, भागवत पाटील, किशोर राघो पाटील, जितेंद्र गवळी, नंदूआबा पाटील, गजानन पाटील, तुकाराम पाटील, अजय पाटील, चेतन पाटील, पवन पाटील, नगरसेवक चंद्रशेखर पाटील, अनिल पाटील, नाना भालेराव, धर्मराज पाटील सोनवद विकाचे चेअरमन, वाघळुद सरपंच गोरख पाटील, चंदू भाटिया, दिनेश नाना, रोटवदचे विशाल पाटील, शंकर पवार, उगलाल पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, युवा सेना उपतालुका प्रमुख अजय पाटील पिंटू भाऊ बोरगाव, अनिकेत पाटील, महेश पाटील, अजय पाटील कैलास सोनवणे, सुरेश देवराम पाटील, संजू महाराज, सुरेश पाटील भाऊसाहेब, किशोर निकम पष्टाने मा.सरपंच राजू पाटील भोद, माजी नगरसेवक पप्पू भावे, धरणगाव शहरप्रमुख विलास महाजन, वाल्मीक पाटील, बुटा पाटील व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंपालाल पाटील यांनी केले.