नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील एक शेतकरी युद्ध सुरू असताना जंगलात गेला होता. तेथे त्याला एक रशियन युद्धनौका दिसली. या युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं. दरम्यान या युद्धनौकेला कुणीही वाली नसल्याचं बघत शेतकऱ्याने त्यावर कब्जा केला. हा रणगाडा चोरुन शेतकरी अब्जावधींचा मालक झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत शेतकरी रणगाड्यासोबत दिसत आहे. जंगलात फिरत असताना शेतकऱ्याला रशियाचा रणगाडा दिसला. आसपास रशियाचे सैनिक नव्हते. ते पाहून शेतकऱ्यानं रणगाडा चोरला. आता शेतकऱ्यानं रणगाडा घराबाहेर उभा केला आहे. या रणगाड्याच्या मदतीनं क्षेपणास्त्र हल्ला करता येतो.
शेतकऱ्याचं नाव इगोर आहे. तो सकाळी जंगलात फिरायला गेला. त्यावेळी त्याला रशियन लष्कराचा 9K330 Tor SAM रणगाडा दिसला. शेतकरी रणगाडा घेऊन घरी आला. अब्जावधीचा रणगाडा हाती लागल्यानं एकाएकी शेतकऱ्याचं नशीब पालटलं. रशियानं निर्मिती केलेला हा रणगाडा द टोर नावानं प्रसिद्ध आहे. टोर रणगाडा अतिशय सामर्थ्यशाली असून कोणत्याही परिस्थितीत हल्ले करू शकतो. सर्व ऋतूंमध्ये तो प्रभावी मारा करतो. टोरमधून मध्यम आणि लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रं डागता येतात. जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता टोरमध्ये आहे. टोरच्या मदतीनं हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली जाऊ शकतात.