नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशिया-युक्रेनमध्ये अद्यापही सुरू आहेत. शनिवारनंतर आज रशियाने (Russia) पुन्हा एकदा युक्रेनमधील (ukraine) कीव्ह (Kiv), मारियुपोल (Mariupol), खारकीव्ह (Kharkiv) आणि सुमी (Sumy) येथे काही काळ युद्ध थांबविण्याचे (ceasefire) घोषित केले आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियाने शनिवारीदेखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. रशियाच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी १० वाजल्यापासून ही शस्त्रसंधी लागू होणार आहे. यामध्ये राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी आणि मारियूपोल या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये आज तिसऱ्या फेरीतील चर्चा होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की फोनवरून चर्चा करण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आज १२ व्या दिवशीही सुरूच आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेकडो जीव गमावले आहेत.















