मुंबई (वृत्तसंस्था) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी कोर्टाने सुनावली आहे.
२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अशातच सचिन वाझेना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण १४ दिवसांच्या कोठडीची एनआयएने कोठडी मागितली होती. मात्र एनआयए कोर्टानं केवळ अकरा दिवस म्हणजेच, २५ तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यामुळे उद्या पुन्हा वाझे यांना NIA कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात येईल. आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला.