TheClearNews.Com
Friday, January 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षित वीजवापर, सुरक्षित जीवन

vijay waghmare by vijay waghmare
January 11, 2026
in विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात वीज ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. घरगुती वापरापासून ते उद्योग, शेती, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य सेवा या सर्व क्षेत्रांत विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र वीज जितकी उपयुक्त आहे, तितकीच ती निष्काळजीपणामुळे धोकादायकही ठरू शकते. अनेकदा अज्ञान, दुर्लक्ष किंवा नियमांचे पालन न केल्यामुळे विद्युत अपघात घडतात. यामध्ये जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान तसेच आर्थिक नुकसान होते. मात्र सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर विद्युत अपघात सहज टाळता येतात. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी 11 ते 17 जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. विद्युत सुरक्षेबाबत जाणीवजागृतीसाठी हा सप्ताह महत्त्वाचा आहे.
शॉर्टसर्किटपासून होणारे अपघात असोत की, वीज उपकरणे हाताळताना होणारे अपघात, हे खबरदारी न घेतल्यामुळेच होतात. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विद्युत अपघाताच्या घटना पाहता आता अधिक जागरूकतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे.

 

READ ALSO

चाळीसगाव नगरपरिषदेकडून ‘तक्रार निवारण’ मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव

चुकीला माफी नाही : वीज ही अशी बाब आहे, ही डोळ्याने दिसत नाही परंतु ती वापरताना काळजी घेतली नाही तर होणारे परिणाम टाळता येत नाहीत. वीज हाताळताना चुकीला माफी नाही. त्यामुळे वीज उपकरणे हाताळताना वापरताना काय काळजी घ्यावी, याचा प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करावा.

दर्जेदार उपकरणांचा वापर : घर, उद्योग, कार्यालय अथवा शेती असो, वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल, स्विचेस अथवा इतर उपकरणे ही प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणेच वापरावीत. उदा. मिक्सर, पाण्याचे हीटर, टोस्टर, ग्राइंडर, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी.

योग्य अर्थिंग : वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकाराची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
इन्सुलेटेड वायरचा उपयोग : अर्थ लीकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) वापरावे. विशेषत: निवासस्थाने आणि व्यावसायिक आस्थापनांत आरसीसीबी (रेसिड्यूअल करंट सर्किट ब्रेकर) हे अत्याधुनिक उपकरण वापरावे, जेणेकरून विजेचा धक्का आणि विद्युत यंत्रणेमुळे लागणाऱ्या आगीचा धोका टळेल. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये 20 ते 50 मीटरची स्वतंत्र मीटर रूम असते. बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मीटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. तेथे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे टाळायला हवे. न्युट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करावा. एका सर्किटमध्ये मल्टी प्लग/तारा घालू नये. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीस निमंत्रण मिळते.

मेन स्विचचा वापर : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशमनचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटण, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावीत. पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत.

आयुष्याचे मोल जाणा : विजेविषयी अज्ञान असणे, ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अतिउत्साहात अगदी निष्णात लोकदेखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीजपुरवठा बंद करून मग काम करणे, अशा छोट्याछोट्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, तंत्रज्ञ यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडित प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत, याची जाणीव सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे. विजेच्या दुरुस्तीचे काम नेहमी प्रशिक्षित व अधिकृत व्यक्तीकडूनच करून घ्यावे.

लहान मुलांकडे द्या लक्ष : लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांनी खेळताना स्विच बोर्डमध्ये वस्तू खुपसणे, तार ओढणे किंवा विद्युत उपकरणांशी छेडछाड करणे टाळावे यासाठी पालकांनी योग्य मार्गदर्शन करावे. सुरक्षित सॉकेट कव्हरचा वापर करून अपघात टाळता येऊ शकतात. शाळांमध्येही विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे प्राथमिक धडे दिले गेले पाहिजेत.

दैनंदिन वीज वापरातील महत्त्वाच्या बाबी : विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. वीजवाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरेढोरे बांधू नका. शेताभोवती तारांचे कुंपण घालून त्यात विद्युतप्रवाह सोडू नका. तात्पुरते लोंबकळणारे वायर वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका. कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका. गंमत म्हणून विजेच्या खांबावर चढणे टाळा. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका किंवा त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका व इतरांनाही तसे करू देऊ नका.

विद्युत सुरक्षा दैनंदिन जीवनाचा भाग बनावी : सुरक्षित वीज वापर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून, जागरूक राहून आणि इतरांनाही योग्य मार्गदर्शन करून आपण विद्युत अपघातमुक्त समाज घडवू शकतो. विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षिततेची सवय लावणे आणि ती वर्षभर जपणे हाच खरा संदेश आहे.
– ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण,
जळगाव परिमंडल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेकडून ‘तक्रार निवारण’ मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

January 9, 2026
जळगाव

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव

January 7, 2026
जळगाव

स्वदेशी जागरण मंचच्या प्रांत बैठकीत स्वावलंबनाचा नारा!

December 28, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
जळगाव

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
विशेष लेख

दिपनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 19, 2025
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 12 जानेवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलवर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका ; तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार

February 18, 2022

मुलीला मारहाण ; सासरवाडीच्या मंडळींनी सासूसह जावयाला बदडलं !

August 23, 2023

आरोग्य विभागातील डाटा एंट्री ऑपरेटरांचा संप !

November 1, 2023

सांगवी हेल्थ सेंटर छळ केंद्र म्हणून देशात पहिला क्रमांकावर असेल – अनिल गोटेंचा आरोप

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...