मुंबई (वृत्तसंस्था) : मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांकडून सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर सलमाननं शस्त्र परवाना संदर्भातही अर्ज केला होता. मुंबई पोलिसांकडून त्याला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन सलमानने शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता.
सलमानने १ वर्षांपूर्वी शस्त्र परवानासाठी केलं होतं अप्लिकेशन मात्र त्यावेळी त्याला परवानगी देण्यात आली नाही. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. सलीम खान यांच्या गार्डला धमकीचे पत्र मिळाले होते. या धमकीच्या पत्रात सिद्धू मूसवालासारखंच तुझंही हाल केले जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे सलमान आणि कुटुंबिंयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.मूसवालाची हत्या बिश्नोई गँगने केल्याची माहिती आहे. लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे. याअगोदरही अनेकदा त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.