मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील व राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मावळ तालुक्यातील १७ कोटी ७३ लाख रुपयाच्या पाटण प्रादेशिक पाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाटण, बोरज, भाजे, सदापुर, दुधिवरे, शिंदगाव, देवले, औंढे, औंढोली येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्याची मागणी होत होती. या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. पाणी योजनेच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करुन काम पूर्ण होईल. व प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचुन माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरुन पाण्यासाठीची वणवण नक्कीच थांबेल. निवडणुकीपुर्वी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.