नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत गाझीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यांसंबधी माहिती दिली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत. याची माहिती राऊत यांनीच ट्वीट करून दिली आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलकांना भेटणार असल्याचे ट्विट राऊत यांनी केले आहे. यानंतर काही वेळातच राऊत यांनी आज गाझीपूरच्या शेतकऱ्यांना दुपारी १ वाजता भेटणार असल्याचे ट्विट केले.
दरम्यान, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्याजवळ शेतकरी आंदोलनामुळे मोठा हिंसाचार उडाला होता. त्यानंतर सिंघू सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.