TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी : अशोक जैन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2023
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज केंद्र सरकारने मांडलेलं बजेट शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी चांगलं बजेट आहे. असं मी म्हणेन. शेतकऱ्यांसाठी सप्तर्षीच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा विनीयोग करायचा ठरवले आणि फायदा घ्यायचा ठरवला तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याची माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण कुठे काय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच पायाभुत सुविधांसाठी खूप मोठा पैसा सरकारने दिला आहे. पायाभूत सुविधा म्हटल्या म्हणजे त्यात रेल्वेचे जाळं, महामार्ग, पोर्ट, विमानतळे आले, त्यानंतर भुयारी बोगदे आले, ब्रिजेज आले. यामुळे दळणवळण चांगले होणार आहे. परंतू यातून रोजगार निर्मिती मोठ्याप्रमाणात आताही झालेली आहे आणि पुढेही जास्त प्रमाणात होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचा समावेश यामध्ये केला आहे. संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.

जलजीवन हर घर पेयजल देण्याचं जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून पाहिले आणि त्यावर त्यांनी सातत्याने काम करणे सुरू केले आहे. याविषयाचा सर्व नागरिकांना फायदा होतो आहे. हे आम्ही या क्षेत्रात असल्याने दिसून येतो आहे. आणि याच भावनेतून त्यांनी या योजनेचे बजेट 60 हजार कोटींवरून 70 हजार कोटींवर नेले ही मोठी बाब आहे. यामुळे प्लास्टिक उद्योगालाही चांगले दिवस येणार आणि त्यासह शेतकऱ्यांना, नागरिकांना पेयजल मिळेल हे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यासोबत शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन सारख्या विविध योजनांना गतिमान करण्यासाठी जास्त तरतूद केली आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

डिजीटल अॅग्रिकल्चर ही कन्सेप्ट सरकारने आणण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे ही चांगली बाब आहे. यात आमच्या कंपनीनेसुद्धा सुरुवात केलेली आहे. अॅग्रीटेक किंवा डिजिटल इन अॅग्रिकल्चर हे शेतकरी आत्मसात करायला लागले आहेत. सध्या निवडक शेतकरी याचा उपयोग करत असून पुढील काळात ही संख्या वाढेल. यामुळे उत्पादन क्षमता वाढून भारताचे नाव या क्षेत्रात अधिक उंचीवर जाईल.

सोबतच हरित क्रांती ही फक्त शेतीमध्येच आतापर्यंत बोलली जात होती परंतु यापुढे ती वाहनांमध्ये येणार आहे. इंधन आतापर्यंत कोळशापासून वेगवेगळ्या माध्यमांपासून बनत होते परंतु सोलरला त्यांनी हरित ऊर्जेत घेतलेले आहे. त्या सोबतच हायड्रोजनचे फ्युएलवर बसेस, ट्रक्स धावणार आहेत. बॅटरी ऑपरेटेड कार्स येत आहेत. इंधनाबाबत एक मोठेपाऊल भारताने उचलले आहे. जगाच्या पाठीवर भारत जगाच्या बरोबर सर्व क्षेत्रात येत आहे. त्यासाठी भारताचे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, उद्योजक जोमाने कामाला लागलेले आहेत. ह्या वर्षाचे बजेट खूप चांगल्या पद्धतीने सरकारने सादर केलेले आहे. सगळ्यांच्या जीवनात फायदा होणार आहे. सर्व सामान्यांसाठी जे काही टॅक्स बेनिफीट दिलेले आहेत अपेक्षेपेक्षा कमी आहेत परंतु त्यांनी काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जास्त देण्याचा प्रयत्न केला असता तर मध्यमवर्गीय , नोकरदार, सर्वसामान्य वर्ग अजून आनंदी झाला असता.

– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ? : रागीब शेख यांचा सवाल !

April 3, 2022

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस !

March 3, 2023

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषद’ ची बैठक उत्साहात संपन्न!

March 14, 2025

उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? ; अमृता फडणवीसांची जीभ घसरली !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group