धरणगाव (प्रतिनिधी) रामबोरीस येथील रहिवासी सतीश पंडित देसले यांनी अंदमान,निकोबार जम्मू-काश्मीर,बटालिक कारगिल,पंजाब,उरी श्री नगर,आंध्र प्रदेश,गुजरात, जामनगर या ठिकाणी सेवा केली. २१ वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
सतीश देसले हे धरणगाव येथे योगेश प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचे साडू आहेत. जळगाव येथे शिवपुराण कथेला आले असताना त्यांच्या सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झाल्याबद्दल सतीश पंडित देसले यांच्या सत्कार डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायत सरपंच धनराज सोनवणे व उपसरपंच चंदन पाटील,उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील,परीट समाज नेते छोटू भाऊ जाधव, हेमंत भाऊ चौधरी, योगेश पी.पाटील सामाजिक कार्यकर्तेगोपाल पाटील, आप्पा पवार, मुंबई येथील धोबी बाबा, नंदकिशोर पाटील, आदित्य योगेश पाटील आदी उपस्थित होते.