धरणगाव प्रतिनिधी । शहरात दि. २४ सप्टेंबर गुरुवार रोजी स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सत्यशोधक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतातील थोर समाज सुधारक – राष्ट्रपिता – महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि बहुजन समाजाला शिक्षण – समता स्वातंत्र्य – बंधुता – न्याय देण्याचे काम केलं सत्यशोधक समाज निर्माण करून बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त केले. सर्वप्रथम सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक हेमंत माळी, व्ही.टी. माळी, एस.एन. कोळी, पी.डी.पाटील, अशोक पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.