पातोंडा (प्रतिनिधी) पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी केली आहे.
अमळनेर, चोपड़ा, धरणगाव, यावल, रावेर, बुऱ्हाणपूर, जळगाव इतरील मार्ग असलेल्या व पातोंडा, सावखेडा या दोन्ही गावापासून जवळील मध्यभागी असलेली सावखेडा चौफुली प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पातोंडा व सावखेड़ा या मध्यम मार्गवरील ही चौफुली आहे. याठिकाणी अगोदर पोलिस चौकी होती. परंतु ती आता बंद झालेली आहे. आधी या मार्गावर पोलीस चौकी तसेच सावखेड़ा टोल नाक्याचा संरक्षणाच्या दृष्टीने लाभ मिळत होता. परंतू आता या परिसरातील अंधार असतो. दरम्यान, पातोंडा गावातील व इतर खेड़यातील प्रवासी प्रवास करत असतात. तसेच पातोंडा व सावखेड़ा या गावातील ग्रामस्थ चौफुलीपर्यंत याठिकाणी रोज सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. तसेच काही तरुण व्यायाम देखील करण्यासाठी येत असतात. काही नागरिक निवांत क्षण घालावा म्हणून व शांत ठिकाणाचा हा परिसर प्रसिद्ध आहे. परंतु याठिकाणी बसण्यासाठी बाक नसल्याने नागरिक रोडवर खाली बसतात. त्यामुळे पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.