अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी घरातच बसावे आणि काहीतरी उपक्रम शिक्षणाचा करावा म्हणून गणिताच्या मास्तर ने पाढे पाठ म्हणा आणि व्हाट्सअपला टाका अशी योजना राबविणे सुरू केले आहे. यामुळे पालक आणि शिक्षक समाधानी झाले आहेत.
ऑनलाईन शिक्षणाला वेळेची मर्यादा असते कारण घरात एकच मोबाईल तोही आई वडिलांकडे असला तर मुलांना वेळेवर मिळत नाही त्यामुळे शिक्षक आणि मुले यांच्यातील संवाद साधला जाईलच याची शास्वती नाही म्हणून सानेगुरुजी शाळेचे डी ए धनगर या गणिताच्या शिक्षकाने मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवून त्यांना कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता येऊ नये म्हणून अभिनव योजना राबवली आहे. प्रत्येक मुलाने पाढे पाठ करून शाळेच्या व्हाट्स अप ग्रुपवर स्वतःचा व्हिडीओ पाढे म्हणताना मुलाने टाकावा म्हणजे खरोखर अभ्यासही होतो आणि मुले घरातच थांबतात यामुळे पालक आणि शिक्षक देखील समाधानी झाले आहेत.