TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदींच्या वाढदिवशी झालेल्या लसीकरण रेकॉर्डमध्ये घोटाळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशभरात २.५ कोटी लोकांना लस देत नवा रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एका मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कोविड लसीकरण प्रमाणपत्र वाटपात घोटाळा व फसवेगिरी झाल्याचे म्हटले आहे. यामधील काही प्रकार तर आश्चर्यकारक आहेत. अनेकांनी कोरोनाची लस घेतली नसतानाही लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आलं होते.

‘द कारवाँ’ या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोविड लसीकरण प्रमाणपत्र वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा व फसवेगिरी झाल्याचे दिसून आले आहे. याबाबतचे वृत्त ‘द वायर’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. या वृत्तात म्हटलेय की, कारवाँच्या पत्रकारांनी देशातील विविध राज्यांची आकडेवारी जमा केली, त्यात असे आढळून आले की, ज्यांनी पहिली लस घेतली त्यांना कोविड प्रमाणपत्र देण्यात आले तर अनेक नागरिकांना कोविडची दुसरी लस न घेताही कोविड प्रमाणपत्र देण्यात आले. कारवाँने हुसैन बाजी यांचे एक उदाहरण दिले आहे. हुसैन बाजी यांना १७ सप्टेंबर रोजी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्यक्षात बाजी यांनी कोविडची लसही घेतलेली नाही. त्यांना गुजरातमधील दाहोद येथील लसीकरण केंद्राकडून लसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आले.गुजरातमधील तुषार वैष्णव व त्यांच्या पत्नीला १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता एसएमएस आला. त्यात त्यांना दुसरी लस दिल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांचे प्रमाणपत्र त्यांच्या घरापासून २५ किमी अंतरावरील एका लसीकरण केंद्राकडून मिळाले. तुषार यांनी आपण लस घेण्यासाठी एवढ्या लांब गेलोच नव्हतो असे स्पष्ट केले. तुषार आपली तक्रार घेऊन १८ सप्टेंबरला लसीकरण केंद्राकडे गेले असता तेथे त्यांच्यासारखीच तक्रार घेऊन येणारे पाच नागरिक होते. तुषार यांच्या तक्रारीकडे उपस्थित नर्सने लक्ष दिले नाही. पण नंतर तुषार यांचे नाव कोविन पोर्टलवर न नोंदवता, आधार कार्ड न तपासता त्यांना कोरोनाची लस दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दुसरीकडे या संदर्भात स्क्रोल या वेबसाइटने देखील बिहारमधील लसीकरण घोटाळा उघडकीस आणला आहे. बिहारमध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी लसीकरण झाले होते. पण या लसीकरणाची आकडेवारी मोदींचा वाढदिवस म्हणून १७ सप्टेंबर रोजी कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आली.कोविन पोर्टलवर १७ सप्टेंबरला अडीच कोटी लसींचे वाटप झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण १७ सप्टेंबरच्या आधी एक आठवडा लसीकरणाचा वेग कमी करून तो ७६ लाखांवर आला होता. यावरून १७ सप्टेंबर रोजी मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाची विक्रमी आकडेवारी दिसावी म्हणून लसीकरणाचा वेग मंदावण्यात आला होता. या दिवसापर्यंत लसींची मागणी कमी ठेवण्यात आली असेही म्हणता येते.

बिहारमध्ये हिल्सा येथील राजू कुमार यांना १५ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रातून फोन आला. त्यांना आठवडाभरात दुसरी लस घेण्यासाठी बोलावण्यात आले. पण १७ सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता राजू कुमार यांना दुसरी लस घेतल्याबद्दल प्रमाणपत्र घ्यावे असा एसएमएस आला. या प्रकरणावरून हैराण झालेल्या राजू कुमार यांनी लसीकरण केंद्रावर फोन केला असता त्यांना गप्प राहण्यास सांगितले व हवी असेल तर केंद्रावरून लस घेऊन जावे असे सांगण्यात आले. अशा अनेक बातम्यांवरून स्पष्ट दिसतेय की, मोदींच्या ‘आत्मसमाधानासाठी’साठी केंद्र व राज्य सरकारने कोविड संबंधित आरोग्य आकडेवारीत फेरफार करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग मंदावला, लसींची बनावट नोंद केली गेली व मोदींच्या वाढदिवशी तो उच्चांक म्हणून दाखवण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशात ओबीसी ४४.४ टक्के !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वादळामुळे वीज खांबावर पडलेली झाडाची फांदी काढायला गेला अन् घडलं अघटीत !

June 9, 2023

‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे रडारवर !

November 27, 2020

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून अंगणवाडी कर्मचारींना वगळण्याची मागणी !

September 21, 2020

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, चौथ्या कसोटीसह टीम इंडियाने जिंकली कसोटी मालिका

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group