भुसावळ (प्रतिनिधी) येथे गुडस यार्डसमोर आरओएच डेपोच्या मागील परिसरात भंगार सामानाला शुक्रवारी रात्री पाऊणेदहाला आग लागली. सुदैवाने जीवित हानी टळली. या आगीमुळे अप-डाउनच्या रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तासाभरात ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
भुसावळ शहरातील मध्य रेल्वे गुड्स यार्ड समोर आरओएच डेपो मागील परिसरात भंगार पडलेल्या जागा ठिकाणी ९ : ४० ते ४५ च्या दरम्यान भीषण आग लागली होती. सुदैवाने जीवित हानी टळली येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाडीला काही परिणाम झाला नाही. तब्बल एक तासाने आग विझवण्याचां काम सुरू होते, दोन फायरफायटरने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
यावेळी घटनास्थळी आरपीएफचे यार्ड थानाचे निरीक्षक दयानंद यादव गुड्स यार्ड सुपरवायझर मुनेश्वर जंगवार व आरओएच डेपो विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन आगीला विझवण्याचा प्रयत्न करत होते.
याच दरम्यान गगुड्स यार्डत ४२ बोगीची माल गाडी लागलेली होती. त्यात २१ बोगीमध्ये रेल्वेने ट्रांसपोर्ट कॉटन सातशे टन लोडिंग होत होती. सुदैवाने ते कॉटनचे वॅगनजवळ आगीचे चिंगारी उडाली नाही. अन्यथा खूप मोठा रेल्वेचा नुकसान झाले असते.