जळगाव (प्रतिनिधी) ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली सौंदर्य प्रसाधनांचे बनावट तथा हलक्या दर्ज्याचा माल विक्रीसाठी करण्यासाठी ठेवलेला आढळून आल्याप्रकरणी एकाविरुद्ध जळगाव शहर पोलिसात (Jalgaon City Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपीन प्रताप वरयाणी, वय३३, धंदा कॉस्मेटीक दुकान, रा. सिंधी कॉलनी, कंवरनगर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Duplicate Cosmetics Seized In Jagaon)
या संदर्भात अधिक असे की, या प्रकरणी सिध्देश सुभाष शिर्के (वय ३१, धंदा नोकरी फिल्ड ऑफीसर, नेत्रिका, कन्सलटींग अॅण्ड इन्वेस्टीगेशन, मुंबई, रा. ४/४ के. एच.दुबे इस्टेट, शामनगर, जोगेश्वरी-पूर्व, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील जळगाव शहरातील बळीराम पेठ, M.G. रोडवरील साई प्लाझा या संकुलातील पहील्या मजल्यावरील गाळा नं. १५,१६ व १७ मधील शान NX या दुकानात व सेंट्रल फुले मार्केटचे तळमजल्यावरील गाळा नं. ५० मधील शान जनरल या कॉस्मेटीक दुकानात बनावट ) ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली सौंदर्य प्रसाधनांची विक्री सुरु होती.
या दुकानांमध्ये एकूण २ लाख ५८ हजार ३१ रुपये किंमतीचा हिंदुस्तान युनिलिव्हरचे LAKME चे वेगवेगळे व रॅटकिट कंपनीनीचे वीट हेअर रिमुव्हर क्रिम प्रॉडक्ट सारखा हुबेहुब बनावट माल कंपनीच्या नावाचे बनावट लेबल व पॅकींगमध्ये बनावट व हलक्या दर्जाचा माल अस्सल असल्याचे भासवून दुकानमालक यांनी स्वतः च्या फायद्याकरीता विक्री करण्यासाठी ठेवलेला आढळुन आला. या प्रकरणी कॉपीराईट कायद्याअंतर्गत विपीन वरयाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. दत्तात्रय पोटे हे करीत आहेत. दरम्यान, सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात दररोजची लाखो रुपयांची उलाढाल असते. अश्यातच एवढा मोठा बनावट माल सापडल्याने, जळगावात खळबळ उडाली आहे.
(प्रतीकात्मक फोटो)