धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. ०९ जुलै शनिवारी सकाळी ९:३० वाजता. विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयात कार्यक्रम संपन्न होईल.
१०/१२ वी नंतरच्या करिअर संधी व पालकांची भूमिका या संदर्भात करिअर गाईडन्स सेमिनार होणार आहे. दहावी व बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे ? सायन्स आर्ट्स कॉमर्स मधील करिअर ? विषयाची निवड कशी करावी ? मुलांचे करियर घडविताना पालकांची भूमिका ? स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरु करावी ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या शिबिरामध्ये मिळतील. या संदर्भात प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व लेखक जयदीप पाटील ( संस्थापक, नोबेल फाउंडेशन जळगाव ) हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सुनिल कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख, अभाविप जळगाव) उपस्थित राहणार आहेत. ईच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.