कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील एपीजे अब्दुल कलाम अवार्ड प्राप्त ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन गयासुद्दीन मुल्लाजी यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशचा कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक २२ जानेवारी रोजी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिवराव लोखंडे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री दादा भुसे, नगर विकास राज्यमंत्री तनपुरे, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, समाज प्रबोधन कार आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. असे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक यादवराव कापसे पाटील यांनी कळविले आहे.