औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील एका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेत्याच्या मुलाच्या लग्नात (Marriage) जेवल्यानंतर तब्बल 700 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह सोहळा बुधवारी ४ जानेवारी रोजी पार पडला. लग्नानंतर रात्री पाहुण्यांसाठी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या मेजवानीत आलेल्या पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरु झाला. यावेळी साधारण 700 जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मेजवानीतील जेवणात स्वीट डिशमधून ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येतोय. त्रास होणाऱ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.