पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडे एका विहिरीत महिलेचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेची आत्महत्या की, खून याबाबत गावात तर्क-वितर्क सुरू आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आला. संबंधित महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, अशी माहिती समोर येत आहे. ही महिला पावरा समाजातील असून तीचा पती आणि ती पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगतांना काही लोकांना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम सुरु असल्याचे कळते. मृत महिलेचे नातेवाईक बुऱ्हानपूर येथून येणार असल्याचे कळते. मयत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, ही दुर्घटना विहिरीत हत्या की आत्महत्या?, हे पोलीस तपासातच समोर येणार आहे.