जळगाव (प्रतिनिधी) शहरात पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली. १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिता-पुत्रात बोलचाल होऊन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून एका बापाने आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, सौरभ सुभाष वर्मा (वय २६ रा. बालाजीपेठ) हे दोन भाऊ, आई-वडिलांसह राहत होता. सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांचे सौरभला बोलचाल होऊन यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्याच वेळी वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला. यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले. हि घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याचे नोदविण्याचे काम सुरु आहे.