TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा : ना.जयंत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर महामंडळामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आढावा बैठक येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राजेश देशमुख, दिलीप वाघ, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. बी. एस. स्वामी, मुख्य अभियंता एम. एस. आमले, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब घोरपडे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, नितिन पोटे, विश्वास दराडे, तुषार चिनावलकर, एल. एम. शिंदे, श्रीमती रजनी देशमुख, अदिती कुलकर्णी यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते.

READ ALSO

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ना. पाटील पुढे म्हणाले की, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पात येत्या तीन वर्षात पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक कामाचे नियोजन करावे. तसेच यासाठी दरवर्षी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे. या धरणाच्या डिझाईनचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करा. जिल्ह्यातील प्रकल्पांना या आर्थिक वर्षात जी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी काही निधी मिळणे बाकी आहे. सदरचा निधी लवकरात लवकर मिळाल्यास कामे पूर्ण करता येतील अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली असता, याकरीता तातडीने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन यावर तोडगा काढण्याची सुचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील वरखेड लोंढे धरण क्षेत्रास वाळूक्षेत्र घोषित करुन याठिकाणी होणाऱ्या वाळू साठयाच्या विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास वापरण्याबाबत तपासणी करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे नुकसान झाले असून याची महामार्ग विभागाकडून भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले असता, मंत्री श्री. पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना तातडीने बोलवून घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्यात. तसेच बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्याची सुचनाही त्यांनी बैठकीत दिली.

बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वाघूर प्रकल्प, शेळगाव बॅरेज, वरखेड-लोंढे, सुलवाडे-जामफळ, महाकाय पुनर्भरण योजना, गिरणा नदीवरील 7 बंधारे, नर्मदा-तापी वळण योजना, नार-पार गिरणा वळण योजना, बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, वरणगाव- तळवेल उपसा सिंचना योजना, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ब्रिटीशकालीन फड बंधारे, भागपूर उपसा सिंचन योजना आदि प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली.

आमदार अनिल पाटील यांनी पाडळसे धरणासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद करावी, पांझरा ते मांदळ नदी जोडप्रकल्पाला मान्यता मिळण्याची मागणी केली. आमदार किशोर पाटील यांनी भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस पाटबंधारे विभागाची ना हरकत मिळण्यासह गिरणा नदीवरील 7 बंधाऱ्याचे काम लवकर होण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने महाकाय पुनर्भरण योजना हा प्रकल्प होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रकल्पातील अडचणी, आवश्यक निधी याबाबतची माहिती कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी यांनी दिली. तर प्रकल्पनिहाय सादरीकरण मुख्य अभियंता श्री. आमले यांनी केले. त्याचबरोबर संबंधित प्रकल्पाची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत दिली.

वाघूर प्रकल्पास आवश्यक निधी मिळाल्यास येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पंतप्रधान कृषि सिंचाई योजनेत घेता येईल. शेळगाव बॅरेजमध्ये जून 2022 मध्ये पाणीसाठा करण्याचे नियेाजन आहे. सुलवाडे- जामफळ योजना 2025 पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महाकाय पुनर्भरण योजनेचा प्रकल्प आराखडा तयार आहे. गिरणा नदीबरील 7 बंधारेसाठी पर्यावरण विभागाची मंजूरी घेण्याची कार्यवाही सुरु असून जिल्ह्यात सुधारित प्रशासकीय मान्यतेची 55 प्रकरणे प्रलंबित असून या प्रकल्पांसाठी 2253 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आहेत. या प्रकल्पांचे भूसंपादनाचे 4074 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. या बैठकीस तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे जळगाव, धुळे, व नंदूरबार येथील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

डेपसांगमधून चीन मागे हटणार होता त्याचे काय झाले ? : सुब्रमण्यम स्वामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या फर्मची ED कडून चौकशी !

August 17, 2023

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर उज्ज्वल निकम म्हणतात…!

July 11, 2021

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रथम वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

January 11, 2021

नशिराबाद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती जाहीर !

April 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group