यावल (प्रतिनिधी) सिनेस्टाईल बंदुकीच्या धाकावर भरदिवसा सराफा दुकानातून लाखोचे सोने लुटून चार दरोडे खोरांनी पळ काढल्याची खळबळजनक घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारात जगदीश कवडीवाले यांचे बाजीराव काशिनाथ कवडीवाले नावाचे सराफा दुकान आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका पल्सर गाडीवर आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी दागिने बनविण्याच्या निमित्ताने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर थोड्याच वेळात चौघां संशयीत एकत्र येताच त्यातील एकाने दुकानदार जगदीश कवडीवाले यांच्या कानशीलावर बंदुक लावत दुकानातील सोने काढून देण्यास भाग पाडले. अवघ्या दहा मिनिटात लाखोच्या सोन्याची लूट करून दरोडेखोर पसार झाले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.