भुसावळ (प्रतिनिधी) पिता- पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच २८ वर्षीय मुलाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात घडली.
गडकरी नगराजवळील शिवदत्त कॉलनीत तरुण पित्याला त्रास देत असल्याने मदतीसाठी पित्याने ११२ क्रमांकावरून मदत मागितल्यानंतर बाजारपेठचे दुपारी तीन वाजता घडली. या हल्ल्यात बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण जखमी झाले असून स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले आहे. हवालदारावर चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव सुनील एकन मेलेलू असे आहे हा घटना स्थळावरून फरार झाला आहे.
हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी धावून गेले. संशयित मुलाला समज देवून सांगत असताना विकृत मुलाने स्वयंपाक घरातील चाकूने चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर संशयित पसार झाला असून चव्हाण यांच्यावर स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश डीबी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.