अमळनेर (प्रतिनिधी) ‘तुझ्या खिशात किती रुपये आहेत, ते माला दे. नाहीतर चाकूने मारुन टाकेल, हजार अशी धमकी देत हातावर आणि पायावर चाकूने वार करून एकाच्या खिशातील ७ हजार ८०० रुपये जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. रमण बापू रामदास (रा.मुठे चाळ स्टेशन रोड, अमळनेर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, शंकर आधार पाटील (वय, ४७ रा.शारदा कॉलनी, वड चौक, अमळनेर) हे दि. ८ जानेवारी रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान, मित्रासोबत रेल्वे स्टेशनवरून चहा पिऊन परत येत होते. याचवेळी रेल्वे स्टेशनच्या लोखंडी गेट ओलांडून असलेल्या रिक्षा स्टॉप जवळ रमण रामदास हा हातात चाकू घेऊन शंकर पाटील यांच्याजवळ आला. त्यानंतर त्याने शंकर पाटील यांना म्हणाला की तुझ्या खिशात किती रुपये आहेत?. ते मला दे नाहीतर मी तूला चाकुने मारुन टाकेल. यानंतर रमणने खरच त्याच्या हातातील चाकुने शंकर पाटील यांच्या उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याखाली दोन वार करुन जखमी केले. तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ७ हजार ८०० रुपये रोख बळजबरीने काढून पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवत रमण रामदासला अटक केली आहे. पुढील तपास सफौ रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.















