जळगाव (प्रतिनिधी) स्पा सेंटरच्या मालकाकडून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडालीय.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एका भागात स्पा सेंटर आहे. याचे मालक दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हे आहेत. दि. २४ ते २५ जानेवारी २०२२ दत्तू माने आपल्या जळगावच्या दुकानात आला. त्यानंतर त्याने पिडीत महिलेकडून मजास करून घेतल्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला पगार देणार नाही, अशी धमकी दिली. यानंतर दीपक बडगुजर आणि प्रतिक जैन यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून स्पर्श केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















