रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निमड्या गावातील एका ३२ वर्षीय तरुणाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे कळते.
तालुक्यातील निमड्या गावापासून जवळच संजय बारेला यांचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप समोर आलेले नाहीय.