जळगाव (प्रतिनिधी) यंदा अकरावी प्रवेश प्रक्रीयेत अनेक विघ्न येत असुन सलग तिसऱ्यांदा सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर आज प्रवेश प्रक्रीयेचा बोजवारा उडाला आहे. अवघा एक तास संकेतस्थळ चालले आणि संकेतस्थळ जाम झाल्याने या ऑनलाईन नोंदणीला पुन्हा विलंब होणार आहे. सायंकाळ पर्यंत हे संकेतस्थळ सुरूच न झाल्याने विदयार्थी हैराण झाले आहे. शासनाकडून संकेतस्थळा बाबत तीन वेळा सुधारणा केली असली तरी ही प्रक्रीया ‘फेल’ ठरली आहे.
एस.एस.सी परिक्षांचा निकाल लागुन आठवडाभर पेक्षा जास्त अवधी झाला असला तरी अकरावीच्या प्रवेशाचा तिढा सुटलेला नाही. विषेश म्हणजे शासनाने आज दि.२६ पासून ही प्रक्रीया राबवण्यासाठी वेळापत्रक जाहिर केले होते. तसेच ३ जुन पर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ११ वाजेपासून संकेतस्थळ सुरू झाले. मात्र अवघ्या एक तासात हे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळ्य प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. संकेतस्थळाच्या गोंधळामुळे ही प्रक्रीया ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाकडून पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक कोलमडणार
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी ३ जुन पर्यंत केल्यानंतर ५ जुनला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहिर केली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र शासनाकडून तांत्रिक अडचणी केव्हा सोडवल्या जातात. त्यावर आता प्रवेशाचे वेळापत्रक ठरेल. मात्रा तो पर्यंत विद्यार्थ्यांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
















