जळगाव (प्रतिनिधी) मालधक्क्यावरुन सिमेंटचे लोड करुन शिवाजी नगर उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली.
सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक हा उतारावरुन मागच्या बाजूने रिव्र्व्हस येवू लागला. ट्रक हा पुर्णपणे लोड असल्याने तो भरधाव वेगाने रिव्हर्स येत होता. ही घटना पुलाशेजार उभ्या असलेले राजू गणपत चौरे (रा. धनाजी काळेनगर) यांच्या लक्षा आली. त्यांनी आरडाओरड करीत त्याठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना बाजूला होण्यास सांगितले. ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच नागरिकांगी त्याठिकाणाहून पळ काढला आणि तेव्हढ्यात ट्रकहा रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर जावून आदळून तो थांबला.
अंत्ययात्रेतून घरी जाणारे प्रौढासह चौघे जखमी
शहरातील राधाकृष्ण नगरात राहाणरे सुरेश ओस्वाल (वय ५०) हे अंत्ययात्रेत गेले होते. तेथून घरी जात असतांना त्यांना रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने धडक दिली, यामध्ये ओस्वाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. तसेच उड्डाणपुलाशेजारी उभे असलेले रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), आशा बानो यांच्यास अन्य दोघे जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
३ रिक्षांसह ५ दुचाकींचा चक्काचूर
रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने शिवाजी नगर उड्डाणपुलाशेजारी असलेल्या रिक्षा स्टॉपवर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना चिरडले. या अपघातात रिक्षांसह दुचाकींचा केवळ सांगडा उरला आहे. तसेच येथे मंगल अंकूश गरुड यांची बिर्याणी विक्रीची हातगाडी आहे. या हातागडीसह संपुर्ण बिर्याणी तया तयार करण्याचे साहित्याचे नासधूस होवून नुकसान झाल्याने त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
नुकसान भरपाईसाठी मांडला ठिय्या
या अपघातात नुकसान झालेल्या रिक्षा चालकांसह दुचाकीस्वारांनी ट्रकच्या मालकाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी त्यांनी अपघातस्थळी ठिय्या मांडला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह पोहेकॉ सुनिल पाटील, अमोल ठाकूर यांच्यासह शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी देखील त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघाग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुक सुरळीत केली.
तर सट्टापेढीतील अनेक जण चिरडले असते
ज्या झाडाला रिर्व्हस येत असलेला ट्रक आदळला त्या झाडाच्या लागून सट्टापेढी सुरु होती. सट्टापेढी चालकाने तेथे तात्पुरत्या स्वरुपात कापडाचे शेड तयार केले होते. दरम्यान, याठिकाणी दिवसभर सट्टा लावण्यासाठी सटोडे दिवसभर गर्दी करीत असतात. हा ट्रक झाडावर न आदळला किंचतसाही अजून बाजूला गेला असता तर सट्टापेढीमधील अनेकजण चिरडले गेले असते. सुदैवाने सट्टापेढीतील कोणालाही दुखापत झाली नाही. अपघात होताच सट्टापेढी चालकाने तेथील साहित्य घेवून तेथे लावलेला फलक काढून तेथून पळून गेला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे मुख्य रस्त्यांवर सट्टापेढी सुरु असल्याचे दिसून येत आहे.