अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एका भागातील 12 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिकेचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार 22 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता घडला. याप्रकरणी संशयित हसन खॉ अमीर खा बेलदार (65, अमळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
11 वर्ष व आठ महिने वयाची पिडीता दिव्यांग व मतिमंद असून ती गल्लीत खेळत असताना संशयिताने 22 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता एका रिक्षात नेत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आजोबांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहेत.