धरणगाव (प्रतिनिधी) महान क्रांतिकारक, शहीदे आजम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळाच्यावतीने भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विनय भावे, नगरसेवक भागवत चौधरी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे लक्ष्मण पाटील, तृप्ती रेस्टॉरंटचे संचालक प्रथम सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मराठे, प्रफुल पवार, हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मण पाटील व गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतातून शहीद भगतसिंग यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी भानुदासआप्पा विसावे यांच्या कडून मंडळाला दिलेल्या स्पिकर सेटला देखील माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, मयूर बागुल, खुशाल मांडगे, आनंद मानकर, विकास मोरवकर, सुशांत सनानसे, गणेश मराठे, निलेश बिचवे, तेजेंद्र चौधरी, अमोल सोनार, भूषण भागवत, सचिन चव्हाण, विशाल सोनार, महेंद्र चव्हाण, राज जगतात, चेतन शिंपी, राकेश मांडगे, प्रशांत जगतात, सागर मांडगे, यज्ञेश मांडगे, किरण सोनवणी या सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत सनानसे यांनी तर आभार प्रदर्शन सुदर्शन भागवत यांनी व्यक्त केले.