चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावातील घाट रोड येथील शिवसह्याद्री क्रिकेट क्लब मार्फत घाटरोड येथील कन्नड नाका परिसरात आयोजित क्रिकेटच्या सामन्यांमध्ये शक्ती क्रिकेट क्लब मालेगाव रोड व शिवसह्याद्री क्रिकेट संघ घाटरोड यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले असून तृतीय क्रमांक यश इलेव्हन क्रिकेट संघाने मिळवीला.
या सामन्यांसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये २१००० यांचे प्रायोजकत्व सामाजिक कार्यकर्ते ववर्धमान भाऊ धाडीवाल यांनी स्वीकारले तर द्वितीय पारितोषिक रुपये ११००० मेहबूब भाई पिंजारी यांनी तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये ७००० शिवसेना प्रवक्ते दिलीप घोरपडे यांनी प्रायोजित केले होते. अंतिम सामना शिवसह्याद्री क्रिकेट संघ व शक्ती क्रिकेट क्लब यांच्यामध्ये होऊन शक्ती क्रिकेट क्लबने हा सामना जिंकत यश संपादन केले. यावेळी सामना पाहण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल, मेहबूब पिंजारी, दिलीप घोरपडे, गणेश आप्पा गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती व अनेक क्रीडा प्रेमी नागरिक व तरुणांनी या सामन्यांचा मनमुरादपणे आनंद घेतला. शिवसह्याद्री क्रिकेट संघ मोरया ग्रुप तसेच जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सर्व कार्यकर्ते सभासदांनी संपूर्ण सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.