अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषद मालकीच्या ढेकूरोडवरील खुल्या भूखंडावर नगरसेवक श्याम पाटील यांच्या संकल्पनेतून श्री संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवराय यांचे भक्ती-शक्ती शिल्प आणि लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे अनावरण व उद्घाटन लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याअगोदर कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या राजभवन येथे आमदार रोहित पवार यांना फेटा बांधून स्वागत करतांना जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, श्याम पाटील, रवि बापू, मनोराज पाटील, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव आदी उपस्थित होते.
















