TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स !

सादर केलेली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम ; विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम ठरल्याने त्यांची निवड झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्यातील तीन‌ नामांकिंत आर्किटेक्चर संस्थांपैकी शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची अंतिम निवड जाहीर केली आहे.

तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यानंतर या क्रीडा संकुलाच्या कामास वेग आला पाहिजे यासाठी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तथा क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांनी या कामात स्वतः लक्ष देत योजना आराखड्याच्या कामास गती दिली.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

शिक्षणाचा नवा आदर्श

३ नोव्हेंबर २०२३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यातील तीन नामांकित वास्तूविशारदांनी क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी श्री राजेश जाधव , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर यांचा समावेश होता. या समितीने उत्तम संरचना, डिझाईन, योजना व आराखडा सादर करणाऱ्या शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची वास्तूरचनाकार तथा प्रकल्प सल्लागार म्हणून निवड केली आहे.

कसे असेल विभागीय क्रीडा संकुल !

मेहरूण येथील गट नंबर ३४३ मधील १४.६५ हेक्टर क्षेत्रावर विभागीय क्रीडा संकुल साकार होणार आहे‌. या क्रीडा संकुलात क्रिकेट पॅव्हेलियन इमारत, क्रिकेट मैदान, ४०० मीटर ऍथलेटिक ट्रॅक, ऍथलेटिक पॅव्हेलियन बिल्डिंग, बहुउद्देशीय सभागृह, कमर्शियल कॉम्प्लेक्स, पृष्ठभाग पार्किंग, वसतिगृह इमारत, कर्मचारी इमारत, इनडोअर गेम्स हॉल, जलतरण तलाव, अतिथीगृह, शूटिंग रेंज, विविध भारतीय खेळांच्या सुविधा, हॉकी मैदान, हॉकी पॅव्हेलियन बिल्डिंग व चेंजिंग रूम अशा सुसज्ज सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सॉफ्टबॉल, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल या खेळांच्या सुविधा तसेच दिव्यांग खेळाडूंसाठी ही या विभागीय क्रीडा संकुलात सुविधा उपलब्ध असणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलासाठी वास्तूरचनाकारांची अंतिम निवड झाल्याने या क्रीडा संकुलाच्या कामास आता गतीने येणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2026 !

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
Next Post

खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या पिशवीतून लांबवली रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातून घरी आल्यावर हिटर लावायला जाताच बसला शॉक ; महिलेचा मृत्यू !

August 4, 2023

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026

राजकीय पदाधिकार्‍याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

September 6, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 जानेवारी 2024 !

January 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group