धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात उद्धव ठाकरे सरकारने केलेले काम ध्येयधोरण बाबत युवानेते आदित्य ठाकरे हे संवाद साधणार असून सर्व शेतकरी बंधूनाही भेट देणार असल्याची माहिती आज सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. ते शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त धरणगावात आयोजित पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.
शिव संवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे साहेब हे धरणगाव तालुका दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने आज शिवसेना धरणगाव तालुकाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. आजच्या बैठकीत शिवसैनिकाना संबोधताना शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना शिवसैनिक धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाहीत. शिवसेना या तालुक्यात कायम जिवंत राहील. किती आले किती गेले, तरी शिवसेनाला काहीच फरक पडणार नाही,असे मनोगत श्री. भंगाळे यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेना एक समुद्र आहे. त्यातून एक बाल्टी पाणी गेले तर फरक पडणार नाही. आता शिवसैनिक आपली ताकद दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत. हजारोंच्या ताफा शिवसैनिकांचा आदित्य साहेब यांच्या सोबत राहील, असा आशावाद व्यक्त केला. पाचोरा नंतर धरणगाव, पारोळा येथे आदित्य साहेबांचा संवाद साधण्याचा कार्यक्रम होईल. दौऱ्यानिमित्त धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या देखरेख खाली सर्व शिवसैनिक कामे बघत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक जवळ शिवसंवाद दौराचा कार्यक्रम संपन्न होईल,असेही श्री. वाघ यांनी सांगितले. तर तालुक्यातील शिवसैनिक शिवसेनेसोबत होते आणि राहतील, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले.
या बैठकीला उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, वासुदेव चौधरी, अहमद खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, उपजिल्हा संघटक शरद माळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील, प.स. सभापती दीपक सोनवणे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.