जळगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र दिनांक ७ मार्च ते १५ मार्च २०२१ दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत कंवरराम चौक (पांडे डेअरी चौक) जळगाव येथे सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी केंद्राचे उदघाटन उद्या रविवारी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक एन.एस.चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, विराज कावडीया यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावे असे आव्हान शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.