जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिवसेना बंडखोर पाच आमदारांच्या विरोधात आज शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे व अपक्ष आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिक संतप्त आहेत.
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पाचही बंडखाेरांविराेधात जळगावात शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेचा अाक्राेश माेर्चा निघणार अाहे. शिवतीर्थ मैदानापासून निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व संपर्क प्रमुख संजय सावंत करणार अाहेत. या माेर्चात जिल्हाभरातून १० ते १५ हजार नागरीक सहभागी हाेतील, अशी माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, समाधान महाजन, महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे अादींनी दिली आहे.