TheClearNews.Com
Saturday, May 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ! : ना. गुलाबराव पाटील

महिनाअखेर होणार नगरपालिका ; भगवा फडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in जळगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद येथील नगरपालिकेचे नोटिफिकेशन या महिन्याच्या अखेरीस निघणार असून येथील पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असणार आहे. कार्यकर्त्यांनी सुक्ष्म नियोजनासह एकदिलाने प्रयत्न करून भगवा फडकावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. युवक हे परिवर्तनातील सर्वात महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांनी आगामी निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ते नशिराबाद येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

नशिराबाद नगरपालिकेची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. यात ते म्हणाले की, जिल्हा परिषदेकडचा रिपोर्ट हा बाकी असून आपण स्वत: हा अहवाल उद्या मंत्रालयात घेऊन जात आहोत. यामुळे या महिन्याच्या अखेरीस नशिराबादला नगरपालिका होणार असल्याचे निश्‍चीत आहे. या आगामी निवडणुकीला सामोरे जातांना शिवसैनिकांनी सुक्ष्म नियोजनाला महत्व देण्याची गरज आहे. वेळप्रसंगी गनीमी काव्याचा वापरू करून आपण निवडणुकीत यश संपादन करण्याचे पूर्ण प्रयत्न करावेत. यासाठी युवा सेवा व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य द्यावे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन हा घटक सर्वात महत्वाचा आहे. याच्या मदतीने आपण निश्‍चीतच निवडणुकीत बाजी मारणार आहोत.

READ ALSO

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे मुस्लीम मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाचा शिवसेनेबाबतचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदललेला आहे. आता लोक जात व धर्माच्या पलीकडे विकासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण हे धरणगाव येथील आहे. तेथे ७० टक्के हिंदू तर ३० टक्के मुस्लीम समाज असतांनाही सलीम पटेल यांच्यासारख्या शिवसैनिकाला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्या विकासाच्या व्हिजनवरच ! यामुळे नशिराबादमध्येही विकासाच्या बळावरच आपण विजय संपादन करणार असल्याचा आशावाद ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी युवक हे आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असे नमूद केले. ते म्हणाले की, निवडणुक प्रक्रियेत युवक हे परिवर्तनाचे काम करत असतात. प्रत्येकाने आपला व्यवसाय व रोजी-रोटी सांभाळून राजकारणात सक्रीय व्हावे. आगामी निवडणुकीत तरूणाईच्या बळावर शिवसेना विजय संपादन करणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आधीच्या नशिराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी ग्रामस्थानी केल्या असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून याची योग्य ती चौकशी होणार असल्याची महत्वाची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख तथा जळगांव मनपाचे माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे यांनी युवासेना व शिवसेना व महिला आघाडी चे मजबूत संघटन बांधणी बाबत कानमंत्र दिला तर युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू खंडारेसर यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख विकास धनगर यांनी केले तर आभार युवासेनेचे चेतन बऱ्हाटे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भगाळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजु चव्हाण, शहरप्रमुख विकास धनगर,युवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, संगायो सदस्य चंदु भोळे, कैलास नेरकर, संघटक आबा माळी, नितीन बेंडवाल, नितीन भोई, मोहन कोलते, दिपक बोंडे, महेंद्र कोळी, विशाल सोनवणे, मयुर झटके, दिपक सपकाळे, संजय देशमुख, सोहन पाटील, सोपान कोळी, राज बेंडवाल, मनोज नाथ, दर्शन झटके, प्रकाश कनगरे, दिनेश सावळे, निलेश धनगर, सर्व युवासैनिक व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील कैद्यांमध्ये कारागृहात सिनेस्टाईल हाणामारी

May 29, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
Next Post

येत्या काळात प्रत्येक निवडणुकीत युवकांना प्राधान्य : आ. अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुकानदाराला शॉक ! बुरखाधारी महिलांनी पायल पाहण्याच्या बहाण्याने चोरले सोने

January 30, 2025

नातीसोबत लग्नास नकार दिल्याच्या रागातून भाच्याचा मामीवर प्राणघातक हल्ला !

May 17, 2022

फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या तब्ब्ल ५० दहशतवाद्यांचा खात्मा

November 3, 2020

नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ! : ना. गुलाबराव पाटील

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group