चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा नांद्रे काकळणे येथील सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावचे उपसभापती महाराणा प्रताप, हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांची नांद्रे काकळणे वि.का.सोसायटी वर बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर संपूर्ण सोसायटीचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत
त्यात पाटील शेषराव ताथू पाटील, महेंद्र सिताराम पाटील, भास्कर तुळशीराम पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, आप्पासाहेब भगवान पाटील, वसंत काशीराम पाटील, सर्जेराव धर्मा, निकमदादा वाल्हा पाटील, रविंद्र शिवराम गंभीरे, शीला सुनील पाटील, ललिता पुंजाराम पाटील, प्रमिलाबाई नाना यांचा समावेश आहे. चाळीसगाव तालुक्यात संपूर्ण बिनविरोध झालेल्या सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
















