पुणे (वृत्तसंस्था) गोठ्यात गुरे- ढोर बांधायला गेलेल्या महिलेवर दोन नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भोर तालुक्यातील भांबवडे या गावात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी २९ वर्षीय शेतकरी महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरं- ढोरं बांधत होती. त्यावेळी आरोपी अनिल आणि महेश तिथे अचानक गेले. त्यानंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी अनिल आणि महेश यांनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. २९ वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, १० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२१ या काळात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.















