बदायू (वृत्तसंस्था) वाशीमध्ये तरुणीसोबत झालेल्या बलात्कारानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा करण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी महंत याच्यासह त्याच्या एका शिष्य आणि चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पूजा करण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
ही धक्कादायक घटना अघैती पोलीस ठाण्या परिसरात घडली आहे. अघैती गावातील महिला रविवारी नेहमीप्रमाणे जवळच्या गावातील मंदिरात पूजेसाठी गेली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने कारमधून या महिलेचा मृतदेह आणला आणि त्यानंतर तिला घराजवळ टाकून फरार झाला. याबाबत स्थानिकांनी माहिती देऊनही वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. बदायू सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. पीडितेचा मृतदेह १८ तासांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी महंत याच्यासह त्याच्या एका शिष्य आणि चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. निर्भयाच्या या पुनरावृत्तीमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायू इथे घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.