अमरावती (वृत्तसंस्था) नववर्षाच्या सुरुवातीलाच ७० वर्षीय आजीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात हि घटना घडली. पोलिसांनी या नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहे. या गुन्ह्याची चर्चा परिसरात रंगू लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रीच्या वेळीत घरात किराणा माल संपल्यामुळे बाहेर सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी साहेबराव इंगळे पीडित महिलेला वाटेत भेटला. तुम्हाला घरी सोडून येतो या बहाण्याने आरोपीने महिलेला जवळच असलेल्या संत्र्याच्या बागेत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची सध्या अकोल्यात सर्वत्र चर्चा होत आहे.